¡Sorpréndeme!

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 6.30 AM : ABP Majha : Maharashtra News

2025-03-12 9 Dailymotion

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 6.30 AM : ABP Majha : 
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देविदास पिंगळे यांच्याविरोधात अविश्वास ठराव पारित. 18 पैकी 15 संचालकांनी सभापतीच्या विरोधात आणला अविश्वास ठराव. भाजपचे शिवाजी चुंबळे यांच्या गटाची येणार सत्ता  
अहिल्यानगरमध्ये जन्म मृत्यू दाखले मिळण्यात अडचणी. सर्वच महानगरपालिका, जिल्हापरिषद तसेच शासकीय कार्यालयांमधील ऑनलाईन सेवा गेल्या एक आठवड्यापासून बंद. 
नांदेडमध्ये महापालिकेच्या हद्दीतील जमिनीचं आरक्षण रद्द. जमीन धारकांना दिलासा. नांदेड महापालिकेच्या नवीन विकास आराखड्यात जमिनीवर करण्यात आलं होतं आरक्षण. 
यवतमाळमध्ये दोन धरणं असूनही दिग्रसमध्ये पाणीटंचाईची झळ. पाणीटंचाईचा प्रश्न निकाली लागण्यासाठी नागरिकांचा पालिकेवर हंडा मोर्चा 
वर्ध्याच्या कारंजामध्ये शासकीय धान्य गोदामातील हमाल संपावर. चार महिन्यांपासून वेतन झालं नसल्याने हमाल कर्मचारी आक्रमक. 
नागपूर महानगरपालिकेत कामगारांच्या विविध मागण्यांसाठी ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून आंदोलन. अग्निशमन विभागात बेरोजगार तरुणांना संधी देऊन रोजगार उपलब्ध करून द्याव्या, यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन.